बहुजननामा ऑनलाइन टीम – कार घेण्यासाठी एकाने डिलीव्हरी चार्जेस व सिक्युरिटी यासह विविध कारणे सांगून त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी फखरुद्दीन शेख (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अप्पर बिबवेवाडी येथे राहतात. दरम्यान त्यांना कार खरेदी करायची होती. यावेळी त्यांनी काही माहिती घेतली होती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना मोबाईलवर संपर्क साधला. तसेच त्यांना वेगवेगळी माहिती देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर कारसाठी म्हणून डिलिव्हरी चार्जेस, सिक्युरिटी चार्जेस, जीएसटी, पार्किंग व अपघात पॉलिसी आणि ड्रायव्हर चार्जेस यासाठी त्यांना ऑनलाइन 1 लाख 2 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यांनी पैसे भरले. मात्र त्यानंतर देखील त्यांना कार दिली नाही. तसेच त्यांनी भरलेले पैसे देखील परत न करता फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर या करत आहेत.