पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | म्यूकर मायकोसिसच्या (mucormycosis) उपचारासाठी वापरले जाणारे लिपोझोमेल अँफोटेरीसीन (Liposomal amphotericin) या इंजेक्शनचा काळाबाजार (Black Marketing) केल्याप्रकरणातील दोघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. पुण्यातील (Pune) सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल (Sessions Judge G.P. Agarwal) यांनी हा आदेश दिला. Pune News | Black marketing of drugs for mucormycosis; Both were denied pre-arrest bail
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धीरज भागवत शिंदे आणि रोहित चतुर्भुज बोराडे (रा. घाटकोपर, मुंबई) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणामध्ये रवींद्र भरत माने (वय ३५, रा. शिवणे) आणि अनिकेत शिवाजी रसाळ ऊर्फ सागर (वय २१, रा. जाधव निवास, नारायणनगर लातूर) यांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुहास तानाजी सावंत Food and Drug Administration Officer Suhas Tanaji Sawant (वय ४१, रा. कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोहित बोराडे याने माने याच्याबरोबर लिपोझोमेल अँफोटेरीसीन या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. माने याने गैरमार्गाने विक्री केलेली इंजेक्शन बोराडे आणि धीरज शिंदे यांनीच पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे. काळ्या बाजारात उपलब्ध केलेली ही इंजेक्शन कुणाकडून आणली याचा तपास करायचा आहे. त्याकरिता आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडीमध्ये तपास करणे आवश्यक आहे. त्याला जामीन मंजूर झाला तर तो गुन्ह्याच्या तपासात सहकार्य न करता तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास त्याच्यावर कायद्याचा धाक राहाणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Government Advocate Premkumar Agarwal) यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरीत आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
Web Title : Pune News | Black marketing of drugs for mucormycosis; Both were denied pre-arrest bail
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Anti Corruption | काय सांगता ! होय, तब्बल 22 लाखांची लाच घेतलेला पोलीस निरीक्षक पुन्हा सेवेत
Jalgaon Bhusawal Train | भुसावळ विभागातील वाहतूक दोन दिवस बंद असल्यानं तब्बल 36 रेल्वे गाड्या रद्द