पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune News |पुणे जिल्ह्याच्या (Pune district) ग्रामीण भागातील (rural areas) निर्बंध सोमवार (दि.16) पासून शिथिल करण्यात आले आहेत. पुणे (Pune News) ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल केल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या मागील काही आठवड्यापासून 5 टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सुट देण्यात आली नव्हती.
मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोना बाधित दर 4.9 टक्क्यांवर आल्याने निर्बंधातून सुट मिळाली आहे.
सर्व हॉटेल, 50 टक्के क्षमतेसह दररोज रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील.
हॉटेलमध्ये रात्री 9 पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे.
पुणे ग्रामीणमधील मॉल सुरु करण्यास परवानगी आहे.
परंतु ग्राहक व स्टाफ यांनी दोन डोस घेतले पाहिजे. मॉल रात्री दहा पर्यंत सुरु दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल, दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेला
असावा आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.
जिम, योगासेंटर, सलून, स्पा रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार आहेत.
विवाह सोहळ्यासाठी खुल्या प्रांगणातील, बंदिस्त मंगल कार्यालयातील संबंधित ठिकाणच्या
आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
खुल्या प्रांगणात क्षमतेच्या 50 टक्के जास्तीत जास्त 200 व्यक्तींना परवानगी तर
बंदिस्त बंगल कार्यालयात 50 टक्के क्षमतेने जास्तीत जास्त 10 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
तर चित्रपट गृहे, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.
इनडोअर व आऊटडोअर क्रीडाप्रकार सुरु राहतील.
Web Title : Pune News | All shops in rural Pune, Hotel and bar will remain open till 10 of night restrictions relaxed
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Delhi suicide | सर्वोच्च न्यायालयासमोर महिलेसह पुरुषानं घेतलं स्वतःला पेटवून; अन्…