बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे : मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहातील सोनोग्राफी मशीनचा प्रोब हा पार्ट नोव्हेंबर २०१९ पूर्वी खराब झाला होता. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत, त्याचबरोबर आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणावर पडत होता.
नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आज अखेर या सोनोग्राफी मशीनला मुर्हूत मिळाला. आज मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहामध्ये नवीन सोनोग्राफी मशीन आणण्यात आले.लवकरच दवाखान्यात कोंढव्यातील नागरिकांसाठी मोफत सोनोग्राफी चालू करण्यातयेणार आहे. नवीन सोनोग्राफी मशीनबरोबरच सोनोग्राफी करणारे डॉक्टर उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांनी महापालिकेकडे केली आहे.
कोरोनाचे महामारी मध्ये नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांनी नागरिकांची आरोग्याची काळजी करताना कै. ठाकरे दवाखान्यात तातडीने १० बेडचा कोविड सेंटर करण्यात आला होता. याचप्रमाणे या दवाखान्यात जनरेटर खराब झाला होता. त्यामुळे कित्येक महिने ऑपरेशन थिएटर बंद होते. याची दखल घेऊन नगरसेविका परविन हाजी फिरोज यांनी आपल्या विकास निधीतून नवीन जनरेटर बसविला.
पेशंटसाठी ओपीडी मध्ये स्वतःच्या खर्चाने पिण्याचे पाण्याची आरो मशीन लावण्यात आली. डिलव्हरी वॉर्डमध्ये टाइल्स बसवण्यात आले. रंगरंगोटी
करण्यात आली पडदे लावण्यात आले.सोनोग्राफीसाठी नवीन रूम तयार करुन त्याचे फर्निचर करण्यात आले .
मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मधील डॉक्टर सीमा शेख, सिस्टर मोरे, सिस्टर श्रुतिका व इतर स्टाफ उपस्थित होते.