बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे शहरात बुधवारी (दि.3) 198 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 306 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 053 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 109 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 769 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 626 इतकी आहे.
शहरात आजपर्यंत 1 लाख 92 हजार 379 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 85 हजार 984 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.