जशपुरनगर : वृत्तसंस्था – शाळेतून घरी परतणार्या 12 वीतील एका विद्यार्थीनीचे अपहरण करून नऊ आरोपींनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. विद्यार्थीनीच्या मैत्रिणीने ही माहिती दिल्यानंतर पोहचलेल्या ग्रामस्थांनी दोन आरोपींना पकडले तर सातजण घटनास्थळावरून फरार झाले. दोन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील जशपुर जिल्ह्यातील पत्थलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पीडित मुलगी मंगळवारी दुपारी बोर्डाच्या परीक्षेसाठी आपली असायन्मेंट जमा करण्यासाठी शाळेत गेली होती. तेथून परतत असताना सायंकाळ झाली. ती आपल्या एका मैत्रिणीसोबत सायकलवरून येत होती. या दरम्यान नऊ आरोपींनी तिला थांबवले आणि मैत्रिणीला धमकी देऊन पळवले. आरोपी विद्यार्थीनीला जंगलात घेऊन गेले. विद्यार्थीनीची मैत्रिण गावात पोहचली आणि तिने सर्व माहिती ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थ शोध घेण्यासाठी निघाले आणि खुप शोध घेतल्यानंतर विद्यार्थीनी जंगला सापडली. ग्रामस्थानी येथे दोन आरोपींना पकडले, तर इतर सात आरोपी पळून गेले. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस गावात आल्यानंतर त्यांच्याकडे दोन्ही आरोपींना देण्यात आले. पीडितेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम 294, 323, 376 डी, 392 आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
फरार आरोपींना लवकर अटक करण्याचे निर्देश
सामुहिक बलात्काराच्या या घटनेनंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. सरगुजा आयजी आर. पी. साय जशपुर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. घटनेची माहिती मिळताच आयजींनी फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. ‘पकडण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी सात आरोपींची नावे समोर आली आहेत. या आरोपींना लवकरच अटक केले जाईल’.
– योगेश देवांगन, एसडीओपी, पत्थलगाव.