बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे शहरात सोमवारी (दि.8) 162 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 145 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 1 हजार 945 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 113 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 779 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 396 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 93 हजार 340 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 87 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाची लस उपलब्ध झाली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. मात्र, कोरोना व्हायरस संक्रमणाबाबत एक दिलासादयक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी आले आहेत. 1 मे पासून आजवरच्या सर्वात निचांकी मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली. रविवारी भारतात 78 लोकांचा मृत्यू झाला.