नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर शनिवारी रात्री दीड वाजता हा अपघात झाला होता. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता निघून गेला होता. पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात रोहन अॅबोर्ट (वय-32) याला अटक केली. त्याला बेलापूर कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला जामीन दिला आहे. मर्सिडीजच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. अक्षय आणि संकेत हे मुंबई पोलिस दलातील एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याची मुलं असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या दिवशी मयत दोघे भाऊ स्क्रीन प्रिंटिंगचे काम करुन बेलापूर येथून तुर्भे सेक्टर क्रमांक 20 येथे राहत्या घरी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या मर्सिडीज कारची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी कार आरोपी रोहन अॅबोर्ट हा गाडी चालवत होता. राहुल हा वाशीतील अॅबोर्ट हॉटेलच्या संचालकाचा मुलगा आहे.
आरोपीला फाशी द्या
अपघातात दोन्ही मुलांना गमावल्याने गमरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा करा अशी मागणी मुलांच्या आईने केली आहे.