Pune Municipal Election 2022 | इच्छुकांना तयारीला लागण्याचा मार्ग मोकळा ! पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर, लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Municipal Election 2022 | स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक (Local Body Election) कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) कामाला लागले आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य आयोगाने मंजुरी दिली असून पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना (PMC Final Division Composition) जाहीर झाली आहे. पुणे शहरातील किमान 32 प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे. (Pune Municipal Election 2022)
निवडणूक शाखा प्रमुख डॉ. यशवंत माने (Dr. Yashwant Mane) म्हणाले, ”येत्या पालिकेच्या निवडणूका त्रि-सदस्यीय प्रभाग म्हणजेच 3 नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरामध्ये 58 प्रभागातून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 57 प्रभाग 3 नगरसेवकांचे तर एक प्रभाग 2 नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल.” (Pune Municipal Election 2022)
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservations) निवडणुका घ्याव्यात आणि 2 आठवड्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या आधी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही 10 मार्च रोजी पूर्ण केली होती. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी मागील मंगळवारी केले होते. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
Web Title : Pune Municipal Election 2022 | final ward composition municipal elections announced supreme court
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Ration Card Rule | मोठी बातमी ! सरकारने रेशन घेण्यासाठी बनवला नवीन नियम, तुम्ही जाणून घेणे आवश्यक
Comments are closed.