Pune Mundhwa Crime | फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; मुंढवा परिसरातील प्रकार

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Mundhwa Crime | फेसबुकवर मैत्री (FB Friends) करुन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून वारंवार शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करुन फसवणूक केली. हा प्रकार सन 2016 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान वानवडी (Wanwadi), लोणावळा (Lonavala), वडकी (Wadki) आणि कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे घडला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Rape Case)

याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या 20 वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (दि.20) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन चंदर मुट्टल Chetan Chander Muttal (वय-22 रा. मुत्तलवाडी, काळंबा देवी मंदिराजवळ, पो. शांतीनगर, ता. पाटण जि. सातारा सध्या रा. कोपरखैरने, मुंबई) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Mundhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची 2016 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन प्रेमसंबंध ठेवले. यानंतर त्याने मुलीला घोरपडी बाजार, फैलवाली चाळ येथे नेऊन तिला तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. दरम्यान, आरोपी चेतन याने गावी जाऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुतार करीत आहेत.