पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – व्याजाने(interest) दिलेल्या रक्कमेवरील व्याज(interest) न दिल्याने भर रस्त्यातून ३१ लाख रुपयांची आलिशान फॉर्च्युनर गाडी जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
अमित कलाटे (रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश चंद्रकांत साळुंके (वय ३४, रा. वाकड, मुळ रा. भोसरी) या व्यवसायिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी याने अमित कलाटेकडून व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. साळुंके हे महामार्गावर पुनावळे येथे ऑक्टोंबर २०१९ मध्ये गाडीच्या चाकाचे पंक्चर काढण्यासाठी थांबले होते. यावेळी अमित कलाटे तेथे आले़ १६ लाख रुपये दिले नाहीत, या कारणावरुन त्यांनी त्यांची ३१ लाख रुपयांची फॉर्च्युनर गाडी जबरदस्तीने चोरुन नेली. अमित कलाटे याच्या भितीमुळे त्यांनी आजवर फिर्याद दिली नव्हती. हिंजवडी पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.