पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोणी काळभोर येथील शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयात शिरुन कागदपत्रे फाडत शिपायांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी शंकर कांतीलाल झरड (वय 35, रा. शिंदवणे गावठाण) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मदन पोपट कांबळे (वय 38, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
झरड मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी कांबळे यांना ग्रामसेवक कुठे आहे, अशी विचारणा केली. कांबळे यांनी ग्रामसेवकाला फोन लावून दिला. त्यांचे बोलणे झाल्यावर शंकर झरड याने आरडाओरडा करुन संगणक ऑपरेटरच्या टेबलावर ठेवलेले सरकारी कागदपत्र अस्ताव्यस्त फेकले व फाडले. झरड यांना समजावण्यास आलेले शिपाई बाळु जाधव व इतरांना त्यांनी अरेरावी केली.
तर शिरवळे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मी आत्महत्या करुन तुम्हा सर्वांना तसेच ग्रामपंचायत बॉडी व अण्णा महाडिक यांच्यावर माझ्या आत्महत्येची चिठ्ठी लिहिणार, अशी धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.