Pune Lok Sabha Election 2024 | शिंदेची शिवसेना भाजपसोबत, पण ठाकरेंच्या सेनेची ताकद जास्त, उमेदवारी न मिळालेल्या पुण्यातील नाराज नेत्याचं मोठं वक्तव्य (Videos)
पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून (Mahayuti) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर भाजपा नेते (BJP Leader) संजय काकडे (Sanjay Kakade) नाराज असल्याचे समोर आले आहे. स्वत: काकडे यांनी आपल्या मनातील खंत भाजपा नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे व्यक्त केली आहे. यासंदर्भात काकडे यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट केली आहे. आपली नाराजी व्यक्त करताना काकडे यांनी शिंदेच्या शिवसेनेबाबत देखील मोठे वक्तव्य केले आहे.
पुण्यातील नाराज भाजपा नेते संजय काकडे यांनी म्हटले की, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवर मी नाराज आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छूक आहे आणि माझी नाराजी ही नैसर्गिक आहे. मात्र मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही.
सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना काकडे यांनी म्हटले आहे की, पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र माननीय रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची १० वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले.
काकडे यांनी पुढे म्हटले आहे की, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक आणि केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला.
पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे, असे काकडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपा उमेदवार मोहोळांनी संजय काकडेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मोहोळ यांचे अभिनंदन आणि स्वागत केले. या भेटीत प्रचाराचे नियोजन आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मोहोळांनी म्हटले होते. त्यानंतर आता काकडेंनी मोहोळांच्या उमेदवारीवर नाराज व्यक्त केली आहे.
Comments are closed.