पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | पुण्यात कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकेमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandal) उत्सव प्रमुख अक्षय गोडसे (Festival Head Akshay Godse) यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर अक्षय गोडसे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) गोडसे कुटुंबाचा हेमंत रासने यांना पाठिंबा असल्याचे अक्षय गोडसे यांनी सांगितले आहे. अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे (Ashok Godse) यांचे पुत्र आहेत.
अक्षय गोडसे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहेत. सध्या कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच दरम्यान अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यानंतर गणेश मंडळांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. आता अक्षय गोडसे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
माझा पाठिंबा हेमंत रासने यांनाच
मी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना पाठिंबा देणार आहे. रवी भाऊ आमचे व्यक्तिश: चांगले संबंध आहेत.
पण आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हटलं नाही. रवींद्र धंगेकर मला सहज भेटायला आले होते.
त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली.
मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्याचे अक्षय गोडसे यांनी सांगितले.
तसेच मी आणि माझ्या कुटुंबाकडून हेमंत रासने यांना जाहिर पाठिंबा देतो.
मी मागील अनेक दिवसांपासून हेमंत रासने यांच्यासाठी काम करतोय. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, फूट नाही.
मात्र असे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. कारण नसताना समाजामध्ये गैरसमज पसरवला जात आहे.
आमचा त्यांना पाठिंबा आहेच तसेच त्यांच्या प्रचारात देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandal festival chief Akshay Godse and his family publicly support BJP candidate Hemant Rasane
हे देखील वाचा :
RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २४ फेब्रुवारीला आयोजन