मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एमपीएससी च्या (MPSC) विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) मान्य केली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून एमपीएससी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन (MPSC Student Agitation) सुरु होतं. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहिर केल्याने पुण्यातील झाशीची राणी चौकात विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करुन निर्णय जाहीर केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचार घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
MPSC विद्यार्थ्यांचे 20 फेब्रुवारीपासून आंदोलन
सोमवारपासून (दि. 20) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते.
जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नवीन परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती.
मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे उलटले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
सरकाने आश्वासन दिल्यानंतर देखील आदेश न काढल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MPSC | mpsc big decision revised examination plan and syllabus is being implemented from the year 2025
हे देखील वाचा :
RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २४ फेब्रुवारीला आयोजन