पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान झाले. गुरुवारी (दि.2) पोटनिवडणुकीची मतमोजणी होत असून यामध्ये कोण जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात चुरशीची लढत होणार असून निकाल (Pune Kasba Peth Bypoll Election Results) कोणाच्या बाजूने लागणार यावर अनेकांनी सट्टा लावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी 8 पासून मतमोजणीला (Pune Kasba Peth Bypoll Election Results) सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तासांचा कालावधी राहिला असून, या निकालावर मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जात असल्याची चर्चा आहे. बुधवारी एका रुपयावर एका उमेदवाराला 45 पैसे आणि एका उमेदवाराला 55 पैसे असा भाव मिळाल्याची चर्चा आहे. प्रत्येक तासाला सट्टा बाजारातील भाव बदलत असून सट्टेबाज सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करुनच सट्टा घेत आहेत. पोलिसांची सट्टेबाजांवर नजर ठेवली आहे. याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये उद्याच्या निकालावर लाखोंच्या पैजा लागल्या आहेत.
मतमोजणीच्या 20 फेऱ्या
मतमोजणी 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (FCI) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील.
सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे.
कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स ची पडताळणी केली जाणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election Results | bet on the result of kasba byelection
हे देखील वाचा :