बहुजननामा ऑनलाईन – घरघुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून करत पतीने खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. खुनानंतर पती पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पूजा तुषार ढमढेरे (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर परिसरात खडकवादी भागात राहण्यास आहेत. दरम्यान घरघुती कारणावरून पती तुषार याने पत्नी पूजा हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पती पसार झाला. हा प्रकार समोर येताच उत्तमनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरघुती कारणावरून त्याने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याचे ठोस कारण समजू शकलेले नाही. पोलीस पती तुषार याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.