सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – Pune-Goa Road Accident | पुण्याहून (Pune) गोव्याला (Goa) एका कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एका बुलेट राइडर (Bullet Rider) तरुणाचा भीषण अपघातात (Road Accident) मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बुलेट चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात गुरुवारी (दि.17) सायंकाळी 6.30 च्या सुमारास कणकवली (Kankavali) येथील वागदे पेट्रोल पंपासमोर घडला आहे. या अपघातामुळे बाइक रायडर ग्रुपवर आणि तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune-Goa Road Accident)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिषेक संजय देसाई Abhishek Sanjay Desai (वय-22 रा. हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुलेटस्वार तरुणांचा ग्रुप मुंबई-गोवा महामार्गावरून
(Accident On Mumbai-Goa Highway) जात असताना अभिषेकचा गाडीवरील ताबा सुटला आणि
त्याची बाईक अपघातग्रस्त झाली. रॉयल इनफिल्डच्या (Royal Enfield) कार्यक्रमासाठी पुण्यातील तरुणांचा
ग्रुप गोव्याला जात होता. या ग्रुपसोबत अभिषेक देखील जात होता. (Pune-Goa Road Accident)
कणकवली येथील वागदे पेट्रोल पंपासमोर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अभिषेकचे बुलेट वरील
नियंत्रण सुटले आणि तोल जाऊन तो खाली पडला. अपघातानंतर दुचाकीस्वारांनी त्याच्या दिशेने धाव घेतली.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघाताची सिंधुदुर्ग महामार्ग पोलिसांनी (Sindhudurg Highway Police) नोंद घेतली आहे.
दरम्यान, या अपघाताची घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune-Goa Road Accident | sindhudurg kankavli wagde petrol pump accident cctv video of royal enfield bikers group one rider died while overtaking watch
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार, चाकणमधील घटना
Kirit Somaiya | ‘उद्या हे लोक सोनिया गांधींचे चरणस्पर्श देखील करतील’ – किरीट सोमय्या