पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात असलेल्या एका गोदामाला (Warehouse) आग लागल्याची घटना घडली आहे. गोदामाला लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक (Pune Fire News) वृत्त आहे. मात्र, या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट (Cylinder Explosion) झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरातील सोपान नगरमध्ये ही घटना (Pune Fire News) घडली आहे. सोपान नगरमधील एका गोडाऊनला आग लागली आहे. हे स्क्रॅप गोडाऊन आहे.
या ठिकाणी तीन कुटुंब राहत होती. अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये सिलेंडर होते. एकापाठोपाठ अनेक सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने वेळीच सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून 5 वाहने, पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानातील भंगार जळून खाक झाले आहे.
तब्बल दोन तासानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आग लागलेल्या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Fire News | a fire broke out at vadgaon sherry godown in pune
हे देखील वाचा :
MNS | ’50 खोके सामाना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला
Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’