पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune District Mining Crusher Industries Association | खाण क्रशर उद्योगातील शासनाच्या जाचक अटी व बदलती शासकिय धोरण या विरोधात पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने (Pune District Mining Crusher Industries Association) 9 डिसेंबर पासून बेमुदत संप केला आहे. पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सचिव योगेश ससाणे (Secretary Yogesh Sasane) यांनी सांगितले.
योगेश ससाणे म्हणाले, गौणखनिजाबाबत शासनाच्या जाचक अटी व गौणखनिज वाहतुकीबाबत बदलती धोरणं यामुळे संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासनाकडून दिवसा शहरामध्ये गौणखनीजाची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तसेच वाहनांवर जीपीएस लावण्याची अट घातली आहे. रात्री वाहतूक केली तर बांधकाम व्यावसायिक माल घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पुणे शहरात सकाळी सहा नंतर रात्री पर्य़ंत गौणखनीजाची वाहतूक करण्यास परवानगी नाकारली आहे.
शासनाच्या या धोरणांविरोधात चर्चा करण्यासाठी 9 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व खाण व क्रशर उद्योजकांची
बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये शासनाच्या धोरणा विरोधात बेमुदत संप करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
तसेच 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये पुढील रणनिती आखली जाणार असल्याचे संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Web Title : Pune District Mining Crusher Industries Association | Indefinite strike on behalf of Pune District Mine Crusher Industry Association
हे देखील वाचा :
Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील घटना
Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर