बहुजननामा ऑनलाइन टीम – हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादात टोळक्याने दोघांवर तलवारीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. येरवड्यातील(Pune ) मच्छिमार्केट परिसरात ही घटना घडली आहे.
जय सुनील अॅन्थोनी असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अनिकेत जगन्नाथ काकडे, दादया वाघमारे, पिंट्या कुसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्बर्ट पीटर रेड्डी (वय २९ ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा(Pune ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्बर्ट व जय एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात हातगाडी लावण्यावरुन वाद झाला होता. त्याचा राग आल्यामुळे जयने इतर साथीदारांना बोलावून अल्बर्टच्या हातगाडीवर काम करणाऱ्या तुषार उकिरडेला मारहाण करुन तलवारीने वार केला. त्यामुळे अल्बर्ट घाबरुन पळू लागले असता, टोळक्याने पाठलाग करुन त्यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीररित्या जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक बलभिम ननावरे करीत आहेत.