पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Cyber Crime News | ट्रेडिंग साईटवरुन बोलत असल्याचे भासवून वेबसाईटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉईन (Lure Of Bitcoin) स्वीकारुन तब्बल १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)
याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील ४६ वर्षाच्या नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॅनियल कुपर, अॅलेक्झांडर हुडहेटडसह दोघा मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० सप्टेबर २०२१ पासून सुरु होता. (Pune Cyber Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत मोबाईल व ईमेलद्वारे संपर्क साधला.
ते ट्रेडएक्सो डॉट कॉम (Tradexo.com) या ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे भासविले.
या वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल,
असे आमिष दाखवून फिर्यादीकडून १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचे २.७९६३६६ बिटकॉईन स्वीकारुन फसवणूक
(Fraud Case) केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील (Sr PI Minal Supe-Patil) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Cyber Crime News | 1 Crore fraud in Pune with the lure of investing in Bitcoin
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न