Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून किशोर आवारेंच्या खून प्रकरणी चौघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळमधील उद्योगपती आणि जनसेवा विकास समितीचे (Janseva Vikas Samiti) संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्या खून प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) एकुण चौघांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी वडगाव मावळ (Wadgaon Maval) येथील न्यायालयात हजर (Maval Court) करण्यात येणार आहे. शुक्रवारी भरदुपारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या (Talegaon Dabhade Municipal Council) समोर आवारे यांचा गोळया घालून (Firing In Pune) आणि कोयत्याने वार (Koyta) करून खून (Kishor Aware Murder Case) करण्यात आला होता. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आवारेंच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके (NCP MLA Sunil Shelke), त्यांचा भाऊ सुधाकर शेळके (Sudhakar Shelke) यांच्यासह 7 जणांविरूध्द तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये (Talegaon Dabhade Police Station) खूनाचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रविण उर्फ रघुनाथ धोत्रे Pravin alias Raghunath Dhotre, आदेश धोत्रे (Adesh Dhotre), शाम निगडकर (Shyam Nigadkar) (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे Nana Alias Sandip Vittal MOre (40, रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेशमंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शुक्रवारी भरदिवसा किशोर आवारेंचा खून झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी युध्दपातळीवर प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-2 च्या (Anti Extortion Cell Pune) पोलिसांनी संदीप विठ्ठल मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवारेंच्या खून प्रकरणी आतापर्यंत एकुण चौघांना अटक केली आहे.
आवारेंचा खून झाल्यानंतर संपुर्ण पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत देखील प्रश्नचिन्हा निर्माण झाले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खूनाच्या (Murder In Pimpri) घटनेनंतर अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Pimpri-Chinchwad police arrested four persons in connection with the murder of Kishor Gangaram Aware
हे देखील वाचा :
Comments are closed.