पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कात्रजमधील भिलारेवाडी (Bhilarewadi, Katraj) परिसरात खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऋतिका जयवंत काळे Ritika Jaywant Kale (वय २१, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ऋतिकाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल तुळशीराम महाजन (Sunil Tulshiram Mahajan) व तुळशीराम महाजन (Tulshiram Mahajan) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारेवाडी परिसरात खाण आहे. खाणीच्या परिसरात या भागातील रहिवाशांकडून कचरा टाकण्यात येतो. ऋतिका कचरा टाकण्यासाठी खाणीच्या परिसरात गेली होती. त्या वेळी तोल जाऊन ती खाणीत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. (Pune Crime)
खाणीच्या परिसरात कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचे ऋतिकाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
सुरक्षेसाठी खाणीच्या कडेला कोणतेही कंपाऊंड करणे आवश्यक असताना कोणत्याही उपाय योजना न
केल्याने तरुणीचा मृत्यु झाल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (Sub-Inspector of Police Nitin Jadhav) तपास करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both
हे देखील वाचा :
Pune Crime | हप्ता देण्यासाठी हॉटेलची तोडफोड करुन मॅनेजरच्या खूनाचा प्रयत्न, सोमवार पेठेतील घटना