पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सदनिकेमध्ये प्लंबिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील वारजे परिसरातील व्होयला सोसायटीमध्ये (Pune Crime) घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दयानंद तारक बनसोडे (वय 39, रा. वनलिका सोसायटी, लवळे फाटा, पिरंगुट) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बनसोडे याचा भाऊ अजित बनसोडे (वय 36) यांनी वारजे पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्लबिंग ठेकेदार विनित गोविंद गाडगीळ (वय 55, रा. कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील व्होयला सोसायटीमध्ये एका सदनिकेत दयानंद हे प्लंबिंगचे काम करत होते. त्यावेळी बाथरूममध्ये त्यांना विजेचा जोरात धक्का बसला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बनसोडे यांना काम करत असताना सुरक्षाविषयक साहित्य न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार गाडगीळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रायकर करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | worker dies of electric shock while doing plumbing work in flat
हे देखील वाचा :
Pune Crime | किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार; कोथरूडमधील घटना
Sayali Sanjeev | अखेर सायलीने ऋतुराजच्या नात्याबद्दल केला खुलासा