मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Prakash Ambedkar | शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी नवीन राजकीय रणनीती आखली जात आहे. त्यासाठी आधीच्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकत्र घेण्यासाठी चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतच युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचे म्हटले आहे. (Prakash Ambedkar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीची माहिती फेटाळून लावली आहे. आमची जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल, तेव्हा सगळ्यांना याची माहिती दिली जाईल, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, चर्चा सकारात्मक पद्धतीने चालली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती करण्यासाठी बहुजन वंचित आघाडी तयार आहे. आघाडीच्या अधिक तपशिलाबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे ईशान्य भारताच्या भेटीवर होते, रविवारीच मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकदा युती करण्याबाबत जाहीर घोषणा झाल्यानंतर त्यात कोणतीही लपवाछपवी करण्यात अर्थ नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हटले.
तसेच सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने युती आघाडीच्या चर्चेची घाई नाही,
जर निवडणूक तोंडावर असती तर तातडीने निर्णय घेण्याचे प्रयत्न केले असते,
त्यामुळे आता वेळ घेत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar denied meeting news with uddhav thackeray for shiv sena vanchit bahujan aghadi alliance
हे देखील वाचा :
Sayali Sanjeev | अखेर सायलीने ऋतुराजच्या नात्याबद्दल केला खुलासा
BSNL Plan Offers | बीएसएनएलने आणला सगळ्यात स्वस्त डाटा पॅक बाजारात, जाणून घ्या किमती