पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ (Physical Relation Video) काढला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस (Row House In Pune) जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण (Rape In Pune) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी फुलेनगर येथे राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटाणी Purushottam Lal Butani (रा. खेसेपार्क, लोहगाव), वासुदेव पाटील Vasudev Patil (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटाणी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र असून त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध आहेत. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटाणी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्या बरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी फिर्यादी यांच्या नावावर असलेली रो हाऊसची मालमत्ता विकण्यास जबरदस्तीने भाग पाडले. ती विकून आलेले पैसे फिर्यादीस न देता त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Threatening to make a Physical Relation video viral! Financial exploitation of women by selling row houses in Vimannagar area Rape Case In Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार