पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला (Physical And Mental Abuse) कंटाळून एका विवाहितेने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तिच्या पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विश्वजीत भोसले, तुकाराम भोसले, उषा भोसले, शितल उढाण, रवींद्र उढाण, सोनल कुमार, अमित कुमार (सर्व रा. मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)
आरती विश्वजीत भोसले (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वैजनाथ दशरथ वाडीकर (वय ५२, रा. सावरगाव, ता. देवणी, जि. लातूर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) (गु. रजि. नं. ४४८/२२) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ डिसेंबर २०१८ ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आरती हिचा विवाह झाल्यापासून
सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आरोपी भांडणे करुन मारहाण करीत.
तसेच शारिरीक व मानसिक त्रास देत असत.
या छळाला कंटाळून आरती हिने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Suicide by strangling a married woman; 7 charged with domestic violence against husban
हे देखील वाचा :
Pune Land survey | खुशखबर ! आता पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी अवघ्या 30 मिनिटांत
Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर
Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी, हडपसर परिसरातील घटना