Pune Crime | हडपसर येथील तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Gambling Den

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) छापा टाकून 5 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 10 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे. ही कारवाई सोमवारी (दि.28) अ‍ॅमनोरा पार्क (Amanora Park) हडपसर येथे करण्यात आली.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

हडपसर येथील अ‍ॅमनोरा पार्क परिसरात पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टकाला. त्यावेळी काही जण बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले. तसेच हुक्क्याचे सेवन (Hookah) करताना 10 जण आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख 41 हजार 620 रुपये व 14 हजार 100 रुपयांचे हक्क्याचे फ्लेवर (Hukka Flavor) तसेच 5 लाख 23 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण 5 लाख 78 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हुक्क्याचे सेवन करताना आढळून आलेल्या 10 जणावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायदा (Maharashtra Gambling Prohibition Act), सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करीता हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote) राजेश माळेगावे (API Rajesh Malegave)
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमय रसाळ,
हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली.