पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | आपल्या पत्नीचे कान भरते, त्यामुळे ती आपल्याशी भांडणे करुन आपल्याजवळ राहत नाही, असा समज करुन घेऊन नात जावयाने ७४ वर्षाच्या सासूच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कात्रज (Katraj) येथील महादेव मंदिराजवळ बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी रत्नाबाई अण्णा लगस (वय ७४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल सुदाम शिंदे Rahul Sudam Shinde (रा. उत्तमनगर – Uttam Nagar, Pune) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल शिंदे हा फिर्यादी यांचा नात जावई आहे.
फिर्यादी या आरोपीच्या पत्नीस शिकवतात. त्यामुळे त्यांची पत्नी सोनाली ही आरोपीकडे राहत नाही.
त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होतात, असा राहुल शिंदे याचा गैरसमज झाला.
त्याचा राग मनात धरुन तो कात्रज येथे आला होता. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी
मारहाण करुन खाली पाडून घरासमोरचा फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी राहुल शिंदे याला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक थोरात (PSI Thorat) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | …so the grandson in law tried to kill the 74 year old mother in law; Incident in Katraj
हे देखील वाचा :
Pune Crime | डॉक्टर पत्नीचे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करुन पतीनेच केली बदनामी