पुणे / पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पत्नीने स्वतःच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यास नकार दिल्याने तिला गोळ्या खाऊ घालत वेडे ठरविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सांगवीत (Sangvi Crime) समोर आला आहे. तिच्याकडे सोने आणि प्रॉपर्टी न दिल्यास नोकरी करू देणार नसल्याची धमकी (Pune Crime) दिली आहे. तसेच पत्नीचा मोबाईल वापरून 50 लाख रुपये स्वतःच्या नावावर ट्रान्सफर (50 lakh transfer) करून घेतल्याचा प्रकार सांगवी पोलीस स्टेशनच्या (Sangvi Police Station) हद्दीत घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पतीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुब्रमण्यम पद्मनाभन अय्यर Subramaniam Padmanabhan Iyer (वय 41, रा. निसर्ग निर्माण सोसायटी, पिंपळे सौदागर) आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अय्यरच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. आरोपीने पत्नीच्या नावे असलेला फ्लॅट विकावा असा तगादा लावला होता. मात्र तिने हा फ्लॅट विकण्यास नकार दिला.
आरोपीने पत्नीला फोन करून शिवीगाळ करीत असून बघून घेण्याची धमकी दिली.
तसेच तिच्याकडील सोन्याचे दागिने (Gold jewelry) देखील तो मागत असून सोने दिले नाही
तर कुठेच नोकरी करू देणार नाही अशी धमकी देखील त्याने दिलेली आहे.
त्याने त्याचा मावशीकडून कोणत्यातरी प्रकारच्या गोळ्या आणून ती वेडी (Crazy) झाली आहे असे सांगून तिला त्या गोळ्या खाऊ घातल्या.
त्याने पत्नीच्या मोबाईलचा वापर करून तिच्या अकाऊंटवरून 50 लाख रुपये स्वतःच्या अकाउंटवर आरटीजीएस (RTGS) द्वारे ट्रान्सफर करून घेतले आहेत.
तसेच तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Shocking! In Pune, the husband gave his wife insane pills
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update