पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | घरी जात असताना वाटेतून १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) दोघांना अटक केली आहे. लक्ष्मण संजय क्षीरसागर Laxman Sanjay Kshirsagar (वय १८, मोरया सोसायटी,वेताळनगर, चिंचवड) आणि रोहीत रमेश सुतार Rohit Ramesh Sutar (वय २१, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०२/२२) दिली आहे. हा प्रकार तुकारामनगरमधील रोहीत सुतारच्या घरी २१ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडला होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्षीरसागर हा वेल्डींगचे काम करतो तर, रोहीत सुतार हा रिक्षाचालक आहे. फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी नातेवाईकांच्या घरी पिठाचा डबा देऊन पुन्हा घरी येत होती. त्याच परिसरात लक्ष्मण क्षीरसागर याने फिर्यादी यांच्या मुलीला उचलून रिक्षाचालक सुतार याच्या खोलीवर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मी तुझ्यासोबत जे केले आहे. ते कोणाला सांगितले तर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर सुतार हा देखील तेथे येऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरुन तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही पिडीत मुलगी राहते घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडाचे आंबे ९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता तोडत होती. यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तिच्याशी गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. या प्रकाराची माहिती झाल्यावर २१ एप्रिल रोजी या दोघांनी केलेल्या कुकर्माची माहिती मुलीने आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Web Title : Pune Crime | Shocking! A 12-year-old girl was abducted and raped by two men in Pimpri Chinchwad of Pune
हे देखील वाचा :
Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ
Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू