पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | वाहन चेकिंग करताना वाहनाला चावी न दिसल्याने केलेल्या चौकशीत वाहन चोरटा हाती लागला समर्थ पोलिसांनी त्याच्याकडून दोन वाहन चोरीचे गुन्हे (Pune Crime) उघडकीस आणले आहेत.
मयुर मोतीराम राठोड (वय 23, रा. गणेशनगर, येरवडा) असे या वाहन चोराचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी वाहन तपासणी करीत होते. त्यावेळी मित्तल कोर्टजवळील रोडवर एका वाहनचालकाकडे चौकशी करीत असताना त्याच्या गाडीला चावी दिसून आली नाही.
त्यामुळे संशयावरुन त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला तेव्हा त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली त्याच्याकडील दुचाकीची पडताळणी केल्यावर ती समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मालधक्का चौकातून चोरीला गेल्याचे आढळून आले आदल्या दिवशीच त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 10 दिवसांपूर्वी येरवडा येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वाहन चोरीचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (deputy commissioner of police priyanka narnaware),
फरासखाना विभागाचे (faraskhana division acp) सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (assistant commissioner of police satish govekar),
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (senior police inspector vishnu tamhane),
निरीक्षक उल्हास कदम (police inspector ulhas kadam)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे,
पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर,
सुभाष पिंगळे, सुमित खुट्टे, सुनिल हसबे, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे,
महेश जाधव, सुभाष मोरे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, नितीन घोसाळकर,
जितेंद्र पवार, श्याम सूर्यवंशी यांनी ही कामगिरी केली.
Web Title : Pune Crime | Samarth police arrest two-wheeler thief, uncover vehicle theft.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी