पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार स्वप्नील किसन भालेकर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 74 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार स्वप्नील किसन भालेकर Swapnil Kisan Bhalekar (वय – 27 रा. टिंगरेनगर रोड, श्रमिक वसाहत, येरवडा) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. स्वप्नील भालेकर याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)
स्वप्नील भालेकर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह विमानतळ,
येरवडा (Yerawada Police Station), विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या (Vishrantwadi Police Station)
हद्दीमध्ये पालघन, तलवार, बांबू , लाकडी दांडके, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder),
खंडणी (Extortion), दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR) केले आहेत.
मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 5 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वप्नील भालेकर याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Punes criminal lodged in Nagpur jail for one year CP Amitabh Gupta takes action against 74 criminals under MPDA Act till date
हे देखील वाचा :
Girls Health | पीरियड्स सुरू झाल्यानंतर थांबते मुलींच्या उंचीची वाढ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे
Pune Crime | खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, परिसरात प्रचंड खळबळ