पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | पुण्यातील सहकार नगर परिसरात (Sahakarnagar Area) हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटेनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली होती. या घटनेला काही दिवस होत नाही तोच याच परिसरात आणखी एक प्रकार समोर (Pune Crime) आला आला. 19 आणि 16 वर्षाच्या तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन ‘या वस्तीचा दादा मीच’ म्हणत दहशत पसरवत वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली. पोलिसांनी कृष्णा सुभाष वैराळ (Krishna Subhash Vairal) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारावर सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) IPC 307, 504, 427, 34 आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत सचिन सुरेश भोसले Sachin Suresh Bhosale (वय – 36 रा. शंकर महाराज वसाहत, ठाकुर गिरणी शेजारी, धनकवडी -Dhankawadi) यांनी बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा वैराळ (वय – 19 रा. दिग्वीजय कॉलनी, संतोष नगर, कात्रज – Katraj) आणि 16 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर घडला. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी एकमेकांच्या घराशेजारी राहत होते.
बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांना ‘मला घाबरुन राहयचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो’ असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादी यांच्यावर वार केला.
मात्र, फिर्यादी यांनी हा वार चकवून घरात पळून गेले.
त्यानंतर आरोपींनी या परिसरातील पाच दुचाकी आणि एक चारचाकी गाडीची तोडफोड करुन 21 हजार 500 रुपयांचे नुकसान केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच फिर्यादी यांच्या गाडीची पेट्रोल टाकी फोडली.
त्यानंतर आरोपींनी हातातील धारदार हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन ‘मीच इथला दादा आहे’ असे बोलून दहशत निर्माण केली.
आरोपी निघून गेल्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकत्रीत येऊन पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Pune Crime Marathi News Of Sahakar Nagar Area
हे देखील वाचा :
Diabetes | मधुमेहाच्या रूग्णांनी ‘या’ 4 फळांचं सेवन करून नये, अन्यथा…