पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीबरोबर जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. गुंतवणुकीसाठी (Investment) रजिस्ट्रेशन फी (Registration Fee) म्हणून ५० टक्के रक्कम मागितली. ती दिल्यानंतर त्याने व्यवहार पूर्ण केल. नाहीच उलट रजिस्ट्रेशनसाठी दिलेली रक्कम परत न करता फसवणूक (Fraud Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी सुधाकर मधुकर कदम Sudhakar Madhukar Kadam (वय ५२, रा. संभाजीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५५६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपक अगरवाल (Deepak Aggarwal) आणि त्यांच्या वकिल अॅड. मनिषा राणे (Adv. Manisha Rane) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दीपक अगरवाल यांच्या लक्ष्मी फायनान्स लि. इन्व्हेस्ट (Lakshmi Finance Ltd. Invest) या कंपनीसोबत फिर्यादीचे गावी भुईज येथील ५ आर क्षेत्रातील एकूण १५ हजार ६०० स्क्वेअर फुट बांधकाम २ हजार ३०० रुपये स्क्वेअर फुटाने विक्रीचा व्यवहार ठरला होता. फिर्यादी यांना गुंतवणुकीचे करारनाम्याची प्रत दीपक अगरवाल यांनी पाठविली. त्यावर ३ टक्के रजिस्ट्रेशन फीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ५ लाख ४५ हजार १०० रुपये देण्यास अगरवाल यांनी सांगितले. ती रक्कम त्यांनी अगरवाल यांचे वकिलांच्या एमडीआर कंन्सल्टट अॅड. मनिषा राणे यांच्या खात्यात नोव्हेबर २०२० मध्ये आर टी जी एस केली. ठरल्याप्रमाणे दीपक अगरवाल याने बिल्डिंगचा व्यवहार पूर्ण केला नाही. भरलेली रजिस्टेशन फी परत न करता फसवणूक (Cheating Case) केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक घोगरे (Sub-Inspector of Police Ghogre) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Not only did the contract not only usurp the registration fee; A case has been registered against two including the woman lawyer
हे देखील वाचा :
Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना