पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपीचा जामीन करुन दिल्यानंतर महिला वकिलास शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) भर दिवसा मारहाण (Beating) करुन विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वसीम सलीम शेख Wasim Salim Shaikh (वय ३७, रा. बुधवार पेठ) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका ३४ वषार्चा महिला वकिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना शिवाजीनगर न्यायालयातील नवीन इमारतीतील जेन्टस बार रुमच्या जवळ सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, आरोपी वसीम शेख हा महिला वकीलांच्या ओळखीचा आहे. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन करुन दिला होता. असे असताना वसीम याने फिर्यादी यांच्याशी वाद करुन अश्लिल शिवीगाळ केली. त्यांचा दुपट्टा ओढून तो फोडून हाताने व लाथाने मारहाण करुन त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक साळवे (Sub-Inspector of Police Salve) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Woman lawyer molested in Shivajinagar court
हे देखील वाचा :
Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक