पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) पत्नीने प्रियकराबरोबर घर सोडून जाताना घरातील रोकड, साडेपाच तोळे सोन्याचे दागिने तसेच माहेरच्या घरातून रोकड तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीने आईच्या प्रियकराने आपला विनयंभग (Molestation Case) केल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत कर्वेनगरमध्ये (Karve Nagar) राहणार्या एका ४३ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद श्रीमंत वाले Shivanand Shrimant Wale (वय २९, रा. कर्वेनगर) व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ मध्ये तसेच १८ एप्रिल २०२३ रोजी घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद याने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून त्यांच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे येणे जाणे सुरु केले. फिर्यादी यांची १५ वर्षाच्या मुलीला व्यायामादरम्यान घाम आला का हे बघण्याच्या बहाण्याने तिचा टी शर्ट वर करुन तिच्या शरीरावर नको तिथे हात लावून तिचा विनयभंग करत असे. असा प्रकार दोन तीन वेळा करुन तिच्या मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. ही बाब कोणाला सांगू नको, म्हणून तिला धमकाविले होते.
शिवानंद याच्याबरोबर फिर्यादीच्या पत्नीने अनैतिक संबंध निर्माण केले. त्यातून ती घरातून पळून गेली.
जाताना तिने घरातील ५० हजार रुपये रोख, १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून ३० हजार
रुपये तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेले.
हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीच्या मुलीने वडिलांना आपलाही त्याने विनयभंग केल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रायकर (API Raikar)
अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | While running away with her lover, the wife stole the jewelry and cash from the house; Case registered against wife’s boyfriend who molested minor girl
हे देखील वाचा :