पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पान टपरी चालविण्यासाठी दरमहा हप्ता (Extortion Case) मागुन तो देण्यास नकार दिल्याने गुंडाच्या टोळक्याने टपरी चालकाच्या कुटुंबाला बांबुने मारहाण (Beating) केली.
याबाबत काळेपडळ येथील एका ५२ वर्षाच्या टपरीचालकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडळ, हडपसर – Hadapsar) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना काळेपडळ येथील बालाजी पान शॉपसमोर (Balaji Pan Shop) रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरी चालवितात. प्रशांत तिकोटे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना पान टपरी चालविण्यासाठी दर महा २ हजार रुपये हप्ता मागितला. हप्ता (Ransom Case) देण्यास त्यांनी नकार दिला. फिर्यादी, त्यांचा मुलगा व पत्नी पान टपरीवर असताना गुंडांनी त्यांना बांबुने मारहाण करुन परिसरात दहशत माजविली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडून गंभीर दुखापत झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक लांभाते तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Wanwadi Police Station – Goons beat up Pan Taprichalak’s family
for refusing to pay extortion; Bambu beat and fractured his wife’s hand
हे देखील वाचा