Trimbakeshwar Temple Case | त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, तर पोलीस म्हणतात…

Trimbakeshwar Temple Case | order from devendra fadnavis to set up sit in trimbakeshwar temple case

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Trimbakeshwar Temple Case | त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एका विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर (FIR) नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे प्रवेश (Trimbakeshwar Temple Case) करण्याचा वाद निरर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केलेला असून हा वाद गैरसमजातून झाल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Nashik Rural SP Shahaji Umap) यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

या घटनेची (Trimbakeshwar Temple Case) चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (Addl DGP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

 

काय आहे प्रकार?

साधारण 13 मे रोजीची ही घटना असून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांची रोजच दर्शनासाठी गर्दी होत असते. त्या दिवशी उत्तर दरवाजाच्या दिशेने जात मंदिरात प्रवेश करायचा असल्याचे जमावाने सांगितले. परंतु उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला होता. या घटनेनंतर दोन दिवसांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने पोलिसांना पत्रव्यवहार करत घटनेची चौकशीची मागणी केली.

 

गैरसमजातून हा वाद झाला

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनेसंदर्भात दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत मुद्दा सोडवल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप म्हणाले, मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद गैरसमजातून झाला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात उत्तर दरवाजातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पोलिसांकडे केली होती.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलोखा बैठक घेतली आणि वादावर पडदा टाकला.
ते म्हणाले, धूप दाखवण्यासाठी काही तरुण मंदिराच्या गेटवर आले होते. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले.
कारण मंदिराची दर्शनाची वेळ संपली होती. यानंतर ते तरुणी गेटवरुन परत गेले.
संबंधित प्रवेश करणाऱ्या लोकांनी देखील हे मान्य केले असून यात कुणाला जर ऑब्जेक्शन असेल तर
आम्ही मंदिराकडे जाणार नाही, असे ते म्हणाल्याचे उमाप यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Trimbakeshwar Temple Case | order from devendra fadnavis to set up sit in trimbakeshwar temple case

 

 

हे देखील वाचा

Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘फ्री पास’बाबत खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून संबंधितावर कडक कारवाई

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी