पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | नियमित कामगार सुट्टीवर गेल्याने अनोळखी बदली कामगारांना त्यांनी कामावर ठेवले. त्यांनी गोदाम (Godown) फोडून साडेचार लाखांची रोकड, मोबाईल चोरुन नेला. (Pune Crime News)
याबाबत रामचंद्र मदनलाल अग्रवाल (वय ४३, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६६४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शांताराम आणि हनंमत असे नाव असलेल्या कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिसोळी येथील पृथ्वीराज वेअर हाऊसमध्ये (Prithviraj Warehouse Pisoli) १ जुलै रोजी घडला. (Pune Crime News)
फिर्यादी यांचे पिसोळी येथे पृथ्वीराज वेअर हाऊस येथे मंगल ट्रेडिंग कंपनीचे (Mangal Trading Company) कोल्डिंग होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या गोदामात दोन मॅनेजर, अकाऊंटट व ३ कामगार आहेत. त्यांचे कामगार सुट्टीवर गेले असताना ते उंड्री चौकातील कामगार अड्ड्यावर यापूर्वी ४ कामगार गोदामात कामासाठी आणले होते. बकरी ईद असल्याने त्यांचे कामगार सुट्टीवर होते. त्यांच्या गोदामावर दोन कामगार आले होते. त्यांनी नाव विचारुन त्यांना कामावर ठेवले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत काम झाल्याने त्यांनी रात्र झाली आहे. आम्ही आता इथेच थांबतो, असे सांगितले.
त्यांनी बाजूला दुसरे मोकळे गोदामात थांबतो असे सांगितले. दुसर्या दिवशी दुपारी ते गोदामात आले, तेव्हा सामान इकडे तिकडे पडले होते. टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले ४ लाख ८० हजार रुपयांची रोकडे व मोबाईल चोरीला गेला होता. त्यांनी सीसीटीव्ही पाहिले तर त्यांच्या गोदामात काल कामाला असलेल्या शांताराम व हनुमंत यांनी गोदामात येऊन चोरी केल्याचे दिसून आले. कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Unidentified transfer workers broke into Godown and stole; Acts of a servant who came from a labor