पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) विवाहित महिलेच्या वडिलांना त्रास दिला. तसेच महिलेच्या पतीसमोर पळवून नेण्याची धमकी देऊन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार पुण्यातील वानवडी (Vanavadi) परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.1) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 39 वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धमेंद्र ठाकूर उर्फ छोटू (वय-43 रा. दरभंगा, बिहार) याच्यावर आयपीसी 354, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी हा फिर्यादी महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. (Pune Crime News)
आरोपी पीडित महिलेच्या वडिलांना त्रास देऊन महिलेच्या घरासमोर येऊन धमकी देऊन शिवीगाळ करत होता. छोटू याने फिर्यादी यांच्या पतीजवळ मी केस मागे घेण्यासाठी नाहीतर तुझ्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणून महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केला. आरोपी सतत पाठलाग करत असल्याने मानहानी होत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
- पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार
- तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना
- ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
- रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल
- Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार
- यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार