पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 18 लाख रुपयांची बॅग पळवून नेली. याप्रकरणी भोंदूबाबा सह चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ससाणेनगर येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत विनोद छोटेलाल परदेशी Vinod Chhotelal Pardeshi (रा. रामनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपआपसांत संगनमत करुन फिर्य़ादी यांची फसवणूक (Cheating)
करण्याच्या उद्देशाने पैशांचा पाऊस (Raining Money) पाडतो असे खोटे सांगितले. फिर्यादी यांना पैशांचा पाऊस पाडून
पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना ससाणेनगर येथील युनिव्हर्सल शाळेशेजारी
(Universal School) राहणाऱ्या विशाल बिनावत यांच्या घरी बोलावून घेतले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 18 लाख रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या घरी आले. आरोपींनी फिर्यादी यांची नजर चुकवून 18 लाख रुपयांची
बॅग पळवून नेली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde) करीत आहेत.
- Pune Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार
- Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”
- NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)
- Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!
- Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…
- Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा