पुणे : बहुजननामा ऑनलाईन– Pune Crime News | पिसोळी परिसरात (Pisoli) ज्येष्ठ नागरिकांचा डोक्यात फरशी मारून खून (Murder In Kondhwa Pune) करणार्याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अवघ्या तासाभराच्या आत गजाआड केले आहे. आई वरून शिव्या दिल्याच्या रागातून मित्रानेच हा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हकिमुद्दीन तायरभाई बारोट (66, रा. पिसोळी ग्रामपंचायत मागे, पिसाळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात मयताची पत्नी मरियम हकिमुद्दीन बारोट यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी महेश महादेव ओव्हाळ (32, रा. सिध्दार्थ नगर, पिसोळी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पिसोळी परिसरातील एका मोकळया जागेमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळयात पडलेला असून त्याच्या डोक्यात व उजव्या डोळयातून रक्त येत आहे असा कॉल कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये आला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune Crime News)
खून झालेल्या व्यक्तीचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, पोलिस नाईक गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, पोलिस अंमलदार सुजित मदन, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सागर भोसले, सुरज शुक्ला यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलिस अंमलदार संतोष बनसुडे आणि अनिल बनकर व सुरज शुक्ला यांना बारोटचा खून हा त्याच्याच मित्र महेश महादेव ओव्हाळ याने केल्याची माहिती मिळाली. तो सध्या सिध्दार्थनगर परिसरात फिरत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हकिमुद्दीन बारोट सोबत दारू पित असताना त्याने मला माझ्या आईवरून शिव्या दिल्या होत्या. त्याचा राग मला आल्याने मी त्याच्या डोक्यात फरशीने मारून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त पार्णिमा तावरे (ACP Purnima Taware), वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogle), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले (PI Sandeep Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil), पोलिस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, पोलिस नाईक गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, पोलिस अंमलदार सुजित मदन, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सागर भोसले, सुरज शुक्ला आणि अनिल बनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | The murder of a senior citizen in Pisoli, the killer was nabbed by Kondhwa police within an hour
हे देखील वाचा :