पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एका प्रेमीयुगुलाने (Love Couple) एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना वाघोली मधील एका लॉजमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सचिन गोकुळ शिंदे Sachin Gokul Shinde (वय-21 सध्या रा. खराडी, मुळ रा. नेहरु कॉलनी, भिंगार, अहमदनगर) आणि कोमल सुनील बर्के Komal Sunil Barke (वय-20 रा. चंदननगर, खराडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. (Pune Crime News)
सचिन आणि कोमल हे दोघे सकळी अकराच्या सुमारास लॉजमध्ये आले होते. सायंकाळी सहा वाजता खोली सोडणार होते.
मात्र, सहा वाजून गेल्यानंतरही त्यांनी खोली सोडली नाही. त्यामुळे लॉज मधील कर्मचाऱ्यांनी सचिनच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी खोलीजवळ जाऊन बेल वाजवली. परंतु आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा ढकलला.
कामगारांनी दरवाजा उघडला असता सचिन आणि कोमल यांनी एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रेमप्रकरणातून दोघांनी जीवन संपवलं असल्याचा
प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोमल ही डी-एमएलटी चे शिक्षण घेत होती.
तर सचिन पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु (API Suraj Rajguru) करत आहेत.