पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून व डोके आपटून खून (Murder) केल्यानंतर पतीने विष प्राशन करुन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना फुरसुंगी (Fursungi Crime News) गावातील साई पॅराडाईज येथे बुधवारी रात्री साडेदहा ते गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वाती अक्षय जाधव (वय २२, रा. साई पॅराडाईज सोसायटी, फुरसुंगी गाव) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, अक्षय आनंदा जाधव (वय २५) याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)
याप्रकरणी स्वाती हिचे वडिल विनायक मारुती थोरात (वय ३९, रा. साईनगर, अहमदनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९५/२३) दिली आहे. त्यानुसार अक्षय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय व स्वाती यांचा ४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अक्षय याचा भाड्याने गाड्या देण्याचा व्यवसाय आहे. दोघामध्ये झालेल्या वादातून अक्षय याने स्वातीचा गळा दाबून व डोके आपटून खून केला. त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी जाधव हे घर उघडत नाही हे समजल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी पाहिल्यावर अक्षय हा अत्यवस्थ असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
स्वातीचा खून करण्यामागचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.
पोलीस उपनिरीक्षक डमरे अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | The husband tried to commit suicide by consuming poison after strangling his wife
हे देखील वाचा :