पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कामगार अड्ड्यावरुन कामासाठी रिक्षामधून जुन्या कात्रज बोगद्यापलीकडे (Old Katraj Tunnel) नेऊन दोन महिलांच्या अंगावरील दागिने, रोकड जबरदस्तीने चोरुन (Robbery In Pune) नेण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत कात्रज येथील गोकुळनगर (Gokul Nagar Katraj) येथे राहणार्या एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५८/२३) दिली आहे. पोलिसांनी चौघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
फिर्यादी व एक महिला कामासाठी कात्रज चौकातील कामगार अड्ड्यावर उभ्या होत्या. तेथे चौघे जण आले व त्यांना कामासाठी चला असे म्हणून रस्त्यावरुन जाणार्या चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगद्याचे पलीकडे घेऊन गेले. प्रवासी गाडी निघून गेल्यावर फिर्यादी व त्यांच्याबरोबरच्या महिलेला कामाच्या ठिकाणी चला असे म्हणून डोंगराकडे जाणार्या कच्या रस्त्यावर नेले. तेथे फिर्यादी यांच्या अंगावरील दागिने व रोकड तसेच त्यांच्या बरोबरच्या महिलेच्या अंगावरील दागिने व मोबाईल असा ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेले. या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी आता पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | The four robbed 2 women after taking them to work