पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | भारती विद्यापीठ परिसरामधून (Bharti Vidyapeeth Police) एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ५० ते ६० लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. आरोपींचा माग काढत असताना मुलाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला होता. दरम्यान, गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) देखील समांतर तपास सुरू करण्यात आला होता.
पोलिसांच्या दोन पथकांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान, आरोपी मात्र पोलिसांना मिळाले नाहीत. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)
- Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)
- Pune Minor Girl Rape Case | पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वानवडी पोलिस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल