पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | राज्यात बारावीच्या परीक्षा (12th Exam) सुरु असून कॉपीमुक्त परीक्षा होत असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून होत आहे. मात्र, नांदेडमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना (Students) कॉपी पुरवल्या जात (Teacher Provide Copy) असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा प्रकार ताजा असताना पुणे जिल्ह्यात देखील अशा प्रकारची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे (Pune Crime News) पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकही सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नऊ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात (Yawat Police Station) महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इत निर्दिष्ट परिक्षा) कायदा कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दौंड तालुक्यातील (Daund Taluka) केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात (Jawaharlal Secondary School) घडला आहे. (Pune Crime News)
27 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरु असताना भरारी पथकाने अचानक शाळेला भेट देऊन तपासणी केली.
त्यावेळी वर्गात काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले.
तसेच या प्रकाराला शाळेत उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे भरारी पथकातील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ
(Kisan Dattoba Bhujbal) यांनी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
किसन भुजबळ यांच्या तक्रारीवरुन यवत पोलिसांनी जालिंदर नारायण काटे (परीक्षा केंद्र संचालक),
रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक), जयश्री गवळी, सुरेखा होन, कविता काशीद, प्रकाश कुचेकर,
अभय सोननवर, विकास दिवेकर, शाम गोरगल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | teacher provide copy to students in hsc exam pune
हे देखील वाचा :
Jalgaon Crime News | मुलाच्या डोळ्यादेखत जन्मदात्या बापाने सोडला जीव
NZ VS ENG | न्यूझीलंडच्या संघाने कसोटीत इंग्लडला धूळ चारत रचला इतिहास