Pune Crime News | स्टेट बँक ऑफ इंडियाला अ‍ॅटो लोन कॉन्सिलरनेच घातला ४७ कोटींचा गंडा; बनावट कागदपत्रे सादर करुन केली ४६ वाहन कर्ज प्रकरणे

Pune Crime News | Expensive lured by more money! Fraud of 50 lakhs of young woman, incident in Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | वाहन (Auto Loan) व गृह कर्जावर (Home Loan) बँका आकर्षक सवलती देऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेत असतात. त्यासाठी बँका काही लोन कॉन्सिलरही (Lone Concealer) नेमते. अशाच एका लोन कॉन्सिलरने बनावट अ‍ॅटोलोन प्रकरणे करुन स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) तब्बल ४६ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य नंदकुमार सेठीया (रा. प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या युनिर्व्हसिटी व टिळक रोड शाखेमधून २०१७ ते २०१९ दरम्यान ४६ वाहन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. बँकेच्या अंतर्गत ऑडीटमध्ये ही प्रकरणे संशयित असल्याचे निष्पन्न झाले. बँकेने अ‍ॅटो लोन कॉन्सिलर म्हणून अदित्य सेठीया याची नेमणूक केली होती. त्याने कर्जदार व इतरांशी संगनमत करुन वाहन कर्ज घेण्यासाठी कट रचला. खोटे व बनावट कोटेशन, टॅक्स इन्व्हाईस, मार्जिन व काही फुल पेमेंटच्या रिसीट तयार केल्या. त्या खरे असल्याचे भासवून बँकेतून मोठ्या प्रमाणावर वाहन कर्ज मंजूर करुन घेतले. त्यातील काही प्रकरणांमध्ये ते सुरुवातीला काही इतर खात्यावर वर्ग करुन नंतर संबंधित वाहन कर्जदार याचे नावावर वर्ग केले. त्यामुळे बँकेची मूळ वाहन कर्ज मंजूर केलेल्या ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांची फसवणुक (Cheating Case) केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे
सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | State Bank of India was defrauded to the tune of 47 crores by the auto loan concealer itself

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune Crime News | पुण्यात वकील तरुणीचा विनयभंग, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर FIR